English | मराठी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अे)
आमच्या विषयी > रिपाइं (अे)
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या खुल्या पत्राच्या आधारावर रिपाइं (अे) ची स्थापना मा. खा. रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. बाबासाहेबांचे स्वप्न होते कि देशाच्या सर्वागीण विकास व्हावा त्यासाठीच रिपाई सतत अहोरात्र झटत आहे. सर्व भारतीयांचा सर्वागीण विकास, सर्व जनतेस शैक्षणिक सुविधा, आरोग्यदायी सुविधा, जातीयता नष्ट करणे, सामाजिक - राजकीय अभिसरण घडवून आणणे व येत्या काळात राजकीय सत्ता प्रस्तापित करण्याशाठी रिपाई कटीबद्ध आह.

आमचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्याच्या विषयी:
१) डॉ . बाबासाहेब आंबेडकरह्यांची जून २०१२ मध्ये History TV 18 & CNN IBN ह्याच्या जगव्यापी सर्वे मध्ये महान भारतीय म्हणून निवड झाली. २ कोटी पेक्षा जास्त लोकांनी या सर्वे मध्ये मतदान केल.
२) नोबेल पुरस्कार विजेत प्रा. डॉ. अमर्त्य सेन म्हणतात की, "डॉ आंबेडकर हे माझा अर्थशास्त्राचे जनक आहेत. ते खरोखरच गरिबांचे, श्रमिकांचे आणि शोषितांचे कैवारी आहेत. आज त्यांना जो मानसम्मान मिळत आहे त्याही पेक्षा कितीतरी जास्त पटीने त्यांना तो मिळायला हवा. त्यांचे अर्थशास्त्रातिल योगदान अचंबित करणारे आणि जगाच्या पाठीवर अविस्मरणीय आहे."
३) श्री. बराक ओबामा, हे अमेरिकेचे राष्ट्रपती डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या बद्दल म्हणतात कि, "तुम्ही कोण आहात आणि कुठून आलात हे तितक महत्वाचे नाही, प्रत्येक मनुष्य त्याची क्षमता वापरू शकतो, जसे डॉ. आंबेडकरांनी स्वत:च्या आयुष्याची उंची गाठली आणि भारत देशाचे संविधान लिहून सर्वसामान्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला.
४) अमेरिका स्थित कोलंबिया विद्यापीठाने डॉ आंबेडकराच्या कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेण्यसा १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अंत्यत दिमाखदार सोहळा साजरा केला व डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे विद्यापीठाच्या ग्रंथालयात अनावरण केल.
 
 
© 2014. All Rights Reserved RPI(A) Strategy