English | मराठी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अे)
आमच्या विषयी > रामदास आठवले
 
राष्ट्रीय अध्यक्ष : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अे),

केंद्रिय राज्यमंत्री भारत : सामाजिक न्याय विभाग
अध्यक्ष: रेल मजदूर युनियन,
उपाध्यक्ष: World Buddhist Fellowship


जीवन परिचय:
लहानपणी वडिलांचे छत्र हरविले. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांची आई काबाडकष्ट करीत होती. प्राथमिक शिक्षण ढालेवाडित (जि. सांगली ) झाल्यानंतर पुढे कांकाकडे मुंबईत शिक्षण घेण्यासाठी गेले. पूढे वडाळ्यात सिदधार्थ विहार वसतिगृहत राहायला गेले. त्यांची ख-या अर्थाने तेथे जडणघडन झाली. १९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली. तेथे ते पँथर मध्ये सक्रिय झाले. त्यांच्यासोबत अनेक मंडळी होती. पँथर्समुळे जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांनी त्यांच्या सहकार्यांसह पँथरचा झंझावात निर्माण केला.

पुढे चालून मा. रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली "भारतीय दलित पँथर" ने जन्म घेतला. महाराष्ट्रातील सर्व दलित, गरीब व पिडीत जनतेच्या वेदना नाहीस्या करण्यासाठी ह्या पँथर ने जंग जंग पछाडले. जेथे जेथे दलितांवर अन्याय आणि अत्याचार होत असे तेथे तेथे पँथर धावून जात असे. अन्यायाचा विरोधात पँथरच्या माध्यमातून त्यांनी आवाज बुलुंद केला. त्यांच्या आंदोलनाची भल्याभल्यांनी धडकी घेतली होती. महाराष्ट्रात भटकंती करीत असताना दलित समाजाबरोबर कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि भटक्या समाजाची दुःख कळली. दलित समाजाबरोबर हाही समाज त्यांना ओळखू लागला. पुढे मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव द्यावे हि मागणी जोर धरू लागली. जो पर्यंत मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर होणार नाही तो पर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार त्यांनी केला. नामांतराचा लढा काही वर्ष सुरु राहिला. सरकारशी संघर्ष केला. मॊर्चे आणि आंदोलने केली. शेवटी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले.

आंदोलन, चळवळ आणि राजकारण सुरु असतानाच त्यांचा १९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रीमंडळात समावेश झाला. प्रारंभी समाजकल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून काम केले. पुढे मुंबई आणि पंढरपुर लोकसभा मतदार संघातून खासदारही झाले.

Biography
1990-95 : Cabinet Minister, Social Welfare and Transport, Employment Guarantee Scheme and Prohibition Propaganda, GOM
1998 : Elected to 12th Lok Sabha, President-RPI.
1998-99 : Member, Committee on Transport and Tourism Member, Consultative Committee, Ministry of Industry.
1999 : Re-elected to 13th Lok Sabha (2nd term).
1999-2000 : Member, Committee on Industry.
2000-2004: Member, Consultative Committee, Minstry of youth affairs and sports.
2004: Re-elected to 14th Lok Sabha (3rd Term) Member, Committee on Transport, Tourism and Culture.
5th Aug 2007: Onwards member, Standing Committee on Labour.
1st May 2008: Member, Financial Committee on Estimates.
 
 
© 2014. All Rights Reserved RPI(A) Strategy