English | मराठी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अे)
आमच्या विषयी > दलित चळवळ
 
दलित चळवळी संदर्भात चर्चा करावयाची झाल्यास तिचे चार अंगभूत भाग पाडून चर्चा करावी लागते. या चार अंगभूत भागापैकी पहिला भाग हा सामाजिक, दूसरा राजकीय, तिसरा सांस्कृतिक/धार्मिक तर चौथा व शेवटचा भाग म्हणजे आर्थिक चळवळ होय. डॉ. बाबासाहेबांनी ह्या चारही चळवळीचे बिजारोपण करून त्यांना वाढविले. जगात कोणतीही व्यक्ती विशिष्ट कालावधी पर्यंतच जगत असते. अंतिम श्वासापर्यंत ती निर्माण केलेल्या चळवळीला टिकवून ठेऊन ती वाढविण्याचे प्रयत्न करीत असते. तरीही आपल्यानंतर चळवळीचे भवितव्य काय?. असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा ती व्यक्ती ज्या समुहाघटकाच्या न्याय हक्कासाठी लढत असते तेव्हा त्या समुहातून कार्यकर्ते व नेते तयार करीत असतात. असामान्य महामानव आपल्या हयातीपर्यंत कार्यकर्त्यांना नेतेपदाचे धडे देत असतात. उद्देश एकच असतो की आपल्या नंतर आपल्या चळवळीचा व कार्याचा अंत होऊ नये. चळवळीचे फायदे समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचणे हे त्या मागचे ध्येय व उद्देश असते.

बाबासाहेबांच्या निधनानंतर (१९५६) दलित चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली होती. बाबासाहेबांनी सांगितलेले बौद्ध धम्म प्रचाराचे काम पुढे न्यायचे थांबले होते. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारातून आणि सिद्धार्थ, मिलिंद या त्यांनी स्थापलेल्या महाविद्यालयांतून दलित तरुण शिक्षण घेत होते.

मा. रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली "भारतीय दलित पँथर" ने जन्म घेतला. महाराष्ट्रातील सर्व दलित, गरीब व पिडीत जनतेच्या वेदना नाहीस्या करण्यासाठी ह्या पँथर ने जंग जंग पछाडले. जेथे जेथे दलितांवर अन्याय आणि अत्याचार होत असे तेथे तेथे पँथर धावून जात असे. अन्यायाचा विरोधात पँथरच्या माध्यमातून त्यांनी आवाज बुलुंद केला. त्यांच्या आंदोलनाची भल्याभल्यांनी धडकी घेतली होती. महाराष्ट्रात भटकंती करीत असताना दलित समाजाबरोबर कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि भटक्या समाजाची दुःख कळली. दलित समाजाबरोबर हाही समाज त्यांना ओळखू लागला.
 
 
© 2014. All Rights Reserved RPI(A) Strategy